राम जन्मभूमीवर रामाचे नाही तर कोणाचे मंदिर बांधणार? – रामदेव बाबा

0
672

नवी दिल्ली, दि.३ (पीसीबी) – अयोध्येत राम मंदिर बांधकाम सुरु करण्याच्या चर्चा सुरु झाल्या असून अनेकजण यावर उघडपणे भाष्य करत आपले मत मांडताना दिसत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडे यांनी अयोध्येबद्दल दिवाळीत चांगली बातमी ऐकायला मिळेल असे सूचक वक्तव्य केल्यानंतर आता योगगुरु रामदेव बाबा यांनीही राम जन्मभूमिवर रामाचे नाही तर कोणाचे मंदिर बांधणार? असा सवाल विचारला आहे.

रामदेव बाबा यांनी न्यायालयाने मिर्णय देण्यास उशीर केला तर संसदेत विधेयक आले पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. ‘न्यायालयाने निर्णय देण्यास उशीर केला तर संसदेत विधेयक आले पाहिजे, आलेच पाहिजे. राम जन्मभूमीवर रामाचे नाही तर कोणाचे मंदिर बांधणार? संत आणि राम भक्तांनी राम मंदिराला उशीर होता कामा नये असा संकल्प केला आहे. मला वाटतं वर्षाच्या सुरुवातीलाच शुभ वार्ता मिळेल’, असे रामदेव बाबा यांनी म्हटले आहे.