राधाकृष्ण विखेंनी आम्हाला वाट दाखवली – मधूकर पिचड

0
348

मुंबई, दि, ३१ (पीसीबी) – गेल्या पाच वर्षांपासून आपल्या क्षेत्रात विकास रखडला आहे. भाजपच्या कार्यकाळात राज्यातील विकास पाहता आणि महाराष्ट्राला अधिक संपन्न बनवण्यासाठी माझ्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी आज भाजपत प्रवेश केला आहे. त्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे एकच विनंती आहे त्यांनी आम्हाला सांभाळून घ्यावे, महाराष्ट्राच्या विकासात आमची साथ त्यांना सदैव असेल.

लोकसभा निकालानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपत प्रवेश केल्य़ानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. परंतू त्यांचा निर्णय योग्य होता आणि त्यांनीच आम्हाला ही वाट दाखवली आहे असे माजी मंत्री, राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष मधूकर पिचड म्हणाले. ते भाजप प्रवेशाच्या कार्यक्रमात बोलत होते.

काँग्रेसराष्ट्रवादीच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईतल्या गरवारे क्लब येथे भाजपामध्ये जाहीररीत्या प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, संदीप नाईक तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर या आमदारांसह राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, नवी मुंबईतील काही नगरसेवकांसह राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत.