राज ठाकरेंनी मोडला ‘हा’ नियम ; भरावा लागला ‘एवढा’ दंड

0
196

मुंबई, दि. 21 (पीसीबी) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सार्वजनिक ठिकाणी पाळायचा नियम मोडल्याने त्यांना दंड भरावा लागला आहे. शुक्रवारी मुंबई ते मांडवा या रो-रो फेरीने राज ठाकरे अलिबाग या ठिकाणी जात होते. त्यावेळी त्यांनी रो-रो बोटीवर मास्क लावला नव्हता. शिवाय ते धूम्रपानही करत होते. त्यामुळे त्यांना १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. विशेष बाब म्हणजे रो-रो बोटीत प्रवाशांनी धूम्रपान करु नये आणि मास्क परिधान करावा अशा उद्घोषणा देण्यात येत होत्या. तरीही राज ठाकरे यांनी हे नियम पाळले नाहीत. त्यामुळे त्यांना १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ‘मुंबई मिरर’ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

रो-रो बोटीच्या मोकळ्या भागात उभं राहून राज ठाकरे मास्क न घालता सिगरेट ओढत होते. राज ठाकरे हे सिगारेट पित असल्याचे आणि त्यांनी मास्क न घातल्याचे बोटीवरच्या कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर राज ठाकरे यांच्याकडे ते गेले. त्यांना बोटीच्या नियमांबाबत सांगितले. राज ठाकरेंना त्यांची चूक लक्षात येताच त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि १ हजार रुपये दंडही भरला.

मंत्रालयातही राज ठाकरेंनी घातला नव्हता मास्क

करोनाची साथ महाराष्ट्रात पसरु लागली तसं सर्व पक्षीयांच्या सूचनांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक बैठक बोलावली होती. या पक्षाला सर्व पक्षीय नेते हजर होते. या बैठकीला राज ठाकरेंचीही उपस्थिती होती. या बैठकीतही राज ठाकरे यांनी मास्क लावला नव्हता. ज्याची बरीच चर्चाही झाली होती. दरम्यान आपला मास्क लावण्यावर विश्वास नाही, असंही राज ठाकरेंनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.