राज ठाकरेंनी अमितच्या लग्नाचे पहिले निमंत्रण कोणाला दिले? 

0
4378

मुंबई, दि. १ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या विवाहाची पत्रिका श्री चरणी ठेवण्यासाठी व  नववर्षानिमित्त  राज ठाकरे व त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन आज (मंगळवार) दर्शन घेतले. त्यानंतर  श्रीचरणी पत्रिका ठेवली.  त्यानंतर  लग्नाची पहिली पत्रिका राज ठाकरे व शर्मिला ठाकरे यांनी उद्योगपती रतन टाटा यांना त्यांच्या घरी जाऊन देत लग्नाला येण्याचे निमंत्रण दिले.

अमित ठाकरेंचे लग्न मुंबईतील लोअर परळ येथील सेंट रेजिस येथे २७ जानेवारीरोजी पार पडणार आहे.   अमित आपली मैत्रीण मिताली बोरुडेसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. या लग्नाला मोजक्याच लोकांना   निमंत्रण देण्यात आले आहे.

२७ जानेवारीला दुपारी १२ वाजून ५१ मिनिटांनी अमित ठाकरेंच्या लग्नाचा मुहूर्त आहे. मुंबईतील लोअर परळ भागातील ‘सेंट रेजिस’मध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. राज ठाकरे यांची होणारी सून  प्रसिद्ध बॅरिअॅट्रिक सर्जन डॉ. संजय बोरुडे यांची कन्या आहे.