राज्याला काही वेगळी अक्कल आहे का? – राज ठाकरे

0
462

मुंबई,दि.११(पीसीबी) – केंद्र सांगतं जिम सुरु करा, विमानतळ सुरु करायला सांगितलं, राज्य म्हणतं आम्ही नाही करणार, मग राज्याला काही वेगळी अक्कल आहे का?” असा सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला आहे. टीव्ही९ मराठी या वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

महाराष्ट्रात जवळपास साडेचार महिने जिम बंद असल्याने व्यायामप्रेमी आणि जिम व्यावसायिकांचा रोष वाढत आहे. ठाकरे सरकारकडे हा मुद्दा उचलून धरावा यासाठी जिम व्यावसायिक आणि बॉडीबिल्डर्सनी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. “जिम ओपन करा, बघू काय होतं” असा सल्ला यावेळी राज ठाकरे यांनी दिला.

“किती दिवस लॉकडाऊनमध्ये काढणार आहात? प्रत्येक जण आपली काळजी घ्या, प्रत्येकाची काळजी घ्या. केंद्राने गाईडलाईन्स दिल्या आहेत, त्या पाळून काळजी घ्या” असे आवाहन राज यांनी केले.

दरम्यान, “केंद्र सांगतं जिम सुरु करा, विमानतळ सुरु करायला सांगितलं, राज्य म्हणतं आम्ही नाही करणार, मग राज्याला काही वेगळी अक्कल आहे का?” असा सवालही त्यांनी विचारला.