राज्याच्या मुख्य सचिवपदी यूपीएस मदान यांची नियुक्ती

0
555

मुंबई, दि. २६ (पीसीबी) –  यूपीएस मदान यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्त करण्यात आली आहे. डी के जैन यांची लोकपाल सदस्यपदी नियुक्ती झाल्याने मुख्य सचिव पदाची जागा रिक्त झाली होती. यूपीएस मदान याआधी वित्त विभागाचे सचिव होते.

मुख्य सचिव पदाच्या स्पर्धेत यूपीएस मदान आणि मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांची नावं आघाडीवर आहेत. मात्र सेवा ज्येष्ठतेनुसार यूपीएस मदान यांची मुख्य सचिव पदी नियुक्ती झाली आहे. मदान हे १९८३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. पुढील सहा महिने मदान मुख्य सचिवपदी राहतील, कारण सप्टेंबर महिन्यात ते सेवा निवृत्त होणार आहेत.