राजकारणी लोकांनी साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप करू नये; नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर

0
381

यवतमाळ , दि. १३ (पीसीबी) –  राजकारणाचा अर्थ राजकारण, समाजकारण, अर्थकारण, पण दुर्दैवाने आता सत्ताकारणाभोवतीच राजकारण फिरत आहे. राजकारणाची सीमित मर्यादा आहे. म्हणून राजकारणी लोकांनी साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप करू नये, असा घरचा आहेर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारला आज (रविवार) येथे दिला.