रहाटणीत सराफी व्यावसायिकावर गोळीबार

0
440

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – रहाटणी येथील ‘पुणेकर ज्वेलर्स’ या दुकानाच्या मालकावर अज्ञातांनी गोळीबार केला. ही घटना आज (बुधवार) दुपारच्या सुमारास कोकणे चौकातील पुणेकर ज्वेलर्स या दुकानात घडली. या घटनेत सराफी व्यावसायिकाच्या पायाला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर घटनास्थळी वरिष्ठ पोलीस दाखल झाले असून आरोपीचा शोध सुरु आहे.