रश्मी बागल, निर्मला गावित आज करणार शिवसेना प्रवेश, कॉंग्रेस राष्ट्रवादीचे आणखी नेते ‘मातोश्री’च्या दारावर

0
440

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित या आज शिवसेना प्रवेश करणार आहेत. गावित यांनी मंगळवारी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला आहे. दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या राष्ट्रावादी कॉंग्रेस नेत्या रश्मी बागल या देखील आज शिवसेना प्रवेश करतील.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पक्ष बदलाचे वारे जोरात वाढत आहे. कॉंग्रेस – राष्ट्रवादीचे अनेक नेते सत्ताधारी भाजप व शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे. पाच दशके कॉंग्रेसशी प्रामाणिक असणाऱ्या गावित कुटुंबातील सदस्य शिवसेनेत जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या मुहूर्तावर देखील सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढत आहे. यामध्ये करमाळ्याच्या रश्मी बागल या आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तर बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचा प्रवेश देखील निश्चित मानला जात आहे.