पाकिस्तानी क्रिकेटर हसन अली झाला भारताचा जावई

0
336

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली मंगळवारी शामियासोबत विवाह बंधनात अडकला आहे. शोयब मलिकनंतर हसनही भारताचा जावाई झाला आहे. हरियाणाच्या नूंह भागात राहणारी शामिया आरझू सध्या एअर अमीरातमध्ये फ्लाईट इंजिनिअर इंजिनिअर म्हणून काम करते.

२० ऑगस्ट मंगळवारी राजी दुबईच्या एटलांटिस पाम जुबेरा पार्क हॉटेलमध्ये हसन अली आणि शामिया आरझू यांचा विवाहसोहळा पार पडला. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पडला.

शामिया आणि हसन अलीचे लग्न शामियाच्या पंजोबांनी ठरवले. गेल्यावर्षी दोघांची भेट झाली होती. तेव्हापासून दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले होते. हसन अलीने पाकिस्तानकडून नऊ कसोटी सामन्यात ३१ बळी मिळवले आहेत. तर ५३ एकदिवसीय सामन्यात ८२ बळी घेतले आहेत.