रशियातून विदयार्थी सुखरूप परत आले

0
249

– पालकांनी अजित पवार, अमोल कोल्हे आणि डी.वाय.एफ.आय चे आभार मानले

आकुर्डी, दि.१० (पीसीबी) – रशिया आणि बाल्टिक देशात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची शेवटची बॅच सुखरूप परत आल्याने पालकांना आनंद झाला आहे. युरोप आणि रशियातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी मायदेशी येण्याचा निर्णय घेतला होता. मात्र विमान कंपन्या,रशियन सरकार,भारतीय दूतावास यांच्यातील वादामुळे विद्यार्थी मास्को येथे अडकून होते.

आकुर्डीतील विदयार्थी आफताब शेख याने डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया(डी वाय एफ आय) पिंपरी कार्यालयाशी संपर्क साधून सरकार पातळीवर मदतीची मागणी केली होती. अखेर डी वाय एफ आय प्रवक्ते क्रांतिकुमार कडुलकर यांनी सर्व अडचणी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री मा.श्री.अजित दादा पवार, खासदार मा.श्री.अमोल कोल्हे यांना तातडीने १० नोव्हेंबर रोजी ईमेल करून प्रशासकीय पातळीवर लक्ष्य वेधण्याची विनंती केली होती. महाराष्ट्रातील ४० विद्यार्थ्यांमधील पुणे येथील १० विदयार्थी सुखरूप परत आल्याची माहिती आफताब शेख यांनी दिली आहे.

त्यांचे वडील श्री.रजमुद्दीन शेख आणि आई गुलनाज शेख यांनी लोहगाव विमानतळावर मुलाचे स्वागत केले
उपमुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा पवार खासदार श्री.डॉ.अमोल कोल्हे आणि डी वाय एफ आय पिंपरी चिंचवड शहर समिती आणि प्रसार माध्यमांचे हार्दिक सहकार्याबद्दल शेख कुटुंबीयांनी आभार मानले आहेत.

परदेशातील भारतीय विदयार्थ्यांनी हवाई यात्रा करण्यापूर्वी भारतीय दूतावासने अधिकृत केलेल्या विमानकंपन्या मार्फतच प्रवास करावा. त्यामुळे कायदेशीर किंवा अन्याप्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
तसेच ज्यांची मुले शिक्षणासाठी परदेशात आहेत त्याची माहिती स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवी संघटनांना दिली तर आपण अनेक अडचणींवर मात करू शकतो असे आफताब शेख याने आकुर्डी येथे सांगितले.