‘महिलांना कामाच्या संधी निर्माण करा’; ‘दुर्गा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य संघटने’चे महानगरपालिकेच्या उपायुक्तांना निवेदन

0
296

पिंपरी, दि.११ (पीसीबी) – दुर्गा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त मा श्री अजित पवार आणि संतोष पाटील यांना निवेदन देण्यात आले.

महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रामुख्याने महिलांना कामाच्या संधी निर्माण कराव्यात तसेच महानगरपालिका परिसरात वाहतूक नियंत्रित करण्यासाठी महिला कमांडोंना संधी दिल्यास शहरातील वाहतूक उत्तम प्रकारे नियंत्रित करू शकतील दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे महिलांना ट्रेनिंग देण्यात येत आहे. या कामांमध्ये अनेक बचत गटातील महिला देखील त्यांना प्रशिक्षण दिल्यास उत्तम प्रकारे कामगिरी करू शकतात परराज्यातील लोकांना संधी देण्यापेक्षा पेक्षा महानगरपालिका परिसरातील स्थानिक यांना महानगरपालिकेच्या विविध कामात संधी द्यावी, जेणेकरून महिलांचे सक्षमीकरण मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. सध्या अनेक महिला बेरोजगार अवस्थेमध्ये जीवन जगत आहेत. आणि सध्याच्या ट्रॅफिक वॉर्डन ला नागरिक जुमानत नाहीत. दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्ष दुर्गा भोर यांनी आज आयुक्तांना निवेदन दिले. दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्ष दुर्गा भोर यांनी आज आयुक्तांना निवेदन दिले. बहुसंख्येने महिला कमांडो उपस्थित होत्या. आयुक्तांनी आश्वासन दिले नक्कीच महिलांना यामध्ये संधी निर्माण केल्या जातील आणि पूर्णपणे सहकार्य केले जाईल.