येरवडा कारागृहात दोन कैद्यांमध्ये हाणामारी; एक गंभीर

0
617

पुणे, दि. २ (पीसीबी) – एकाच खोलीत कैद असलेल्या खुन प्रकरणातील दोघा आरोपींमध्ये जबर हाणामारी झाली. या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (मंगळवार) सकाळच्या सुमारास येरवडा कारागृहात घडली.

तुषार हंबीर असे गंभीर जखमी कैद्याचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

प्राप्त माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास खुन प्रकरणातील आरोपी शाहरुख शेख आणि तुषार हंबीर हे येरवडा कारागृहातील एका खोलीत कैद होते. यावेळी त्यांच्यात वाद होवून भांडण झाले. यामुळे दोघांनी एकमेकांना मारहाण केली. यामध्ये तुषार हंबीर हा गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. भांडणाचे कारण अद्याप समजू शकले नाही. कारागृह पोलिस तपास करत आहेत.