युतीचे ठरले; लोकसभेसाठी भाजप-शिवसेनेचे २५-२३ जागांचे सूत्र ?

0
2207

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – आगामी लोकसभेसाठी भाजप-शिवसेनेचे २५ – २३ जागांचे सूत्र ठरले असून त्यानुसार दोन्ही पक्ष निवडणूक  लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.   शिवसेना-भाजप यांच्या युतीची बोलणी अंतिम टप्प्यात आली  असून  अखेरच्या वाटाघाटी सुरु आहेत.  त्यामुळे  युती होणार असल्याचे  निश्चित मानले जात आहे.

२०१४  च्या लोकसभेच्या निवडणुकांत ४८ जागांपैकी भाजपने २६ तर, शिवसेनेने २२ जागा लढवल्या होत्या. यावेळी भाजप लोकसभेची एक जादा जागा शिवसेनेला देण्यास तयार आहे, असल्याचे समजते. त्यामुळे जागावाटपाचा फॉर्म्युला २५ – २३ असा असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाजपशी युती करण्याबाबत शिवसेनेत दोन गट पडले आहेत.  युती होण्याबाबत मंत्री  एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई आणि अनिल देसाई आग्रही आहेत. तर युतीच्या विरोधात संजय राऊत, दिवाकर रावते आणि रामदास कदम आहेत.  पण अंतिम निर्णय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेच घेणार आहेत.