‘या’ प्रसिद्ध ऑइल कंपनीच्या गोडाऊनमधून ‘एवढ्या’ लाखांचे ऑइल चोरीला

0
217

चिंबळी, दि.१९ (पीसीबी) : राका ऑइल कंपनीच्या गोडाऊन मधून अज्ञात चोरट्यांनी वेगवेगळ्या ऑइलचे 25 लाख 98 हजारांचे 273 बॉक्स चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 17) सकाळी दहा वाजता चिंबळी येथे उघडकीस आली.

सुनील दिगंबर गीते (वय 37, रा. मोशी) यांनी याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राका ऑइल कंपनीचे चिंबळी मधील गायकवाड वस्ती येथे गोडाऊन आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसहा ते बुधवारी सकाळी साडेदहा वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनच्या शटरच्या लॉकपट्ट्या व आतील गेटच्या झडपेची लॉकची कडी उघडून गोडाऊनमध्ये प्रवेश केला. 12 लाख 99 हजार 595 रुपयांचे मोबील एक झिरो डब्ल्यू 40 फॉर एलचे 138 बॉक्स, एक लाख 7 हजार 439 रुपयांचे मोबील एक एम जी ए डब्ल्यूचे 11 बॉक्स, तसेच 11 लाख 91 हजार 630 रुपयांचे मोबील एक एम जी ए डब्ल्यू 20चे 124 बॉक्स असा एकूण 25 लाख 98 हजार 664 रुपयांचे 273 ऑइलचे बॉक्स चोरट्यांनी चोरून नेले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.