‘या’ कारणात्सव तिच्यावर शारीरिक व मानसिक छळ केला

0
358

हिंजवडी, दि. ३ (पीसीबी) : नपुंसक असल्याचे लपवून लग्न केले तसेच, शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासुवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2021 दरम्यान, बावधन येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी पिडित महिलेनं शुक्रवारी (दि.02) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती व सासुवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने नपुंसक असल्याचे लपवून फिर्यादी महिलेशी विवाह केला. तसेच, आरोपी पती आणि सासुने तिला धमकावत शारीरिक व मानसिक छळ केला. असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोरकर करीत आहेत.