आणखी एका सुपरस्टार अभिनेत्याला कोरोनाची लागण !

0
295

मुंबई.दि.०४(पीसीबी) – बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला करोना झाल्याचे समोर आले आहे. सध्या अक्षय होम क्वारंटाइन आहे. अक्षयने ट्विट करत करोना चाचणी पाझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे.

“मी सर्वांना हे सांगू इच्छितो की आज सकाळी माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी मी विनंती करतो की त्यांनी स्वत: करोना चाचणी करून घ्या आणि काळजी घ्या. लवकरच अॅक्शनमध्ये परत येईल” अशा आशयाचं ट्विट करत अक्षयने त्याला करोनाची लागन झाल्याची माहिती सगळ्यांना दिली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी आलिया, रणबीर कपूर, आमिर खान, आर माधवन, विक्रांत मेसी, कार्तिक आर्यन, फातिमा सना शेख आणि गायक आदित्य नारायण आणि त्याच्या पत्नी या कलाकारांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.