यसुफ लकडावाला बरोबर आता शरद पवार यांचा फोटो, भाजपाचे ट्विट,

0
531

मुंबई, दि. २७ (पीसीबी) : मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मातोश्री समोर हनुमान चालिसा पठनाच्या वादानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या नवनीत राणांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले होते. राणा यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित आणि ईडीने अटक केलेल्या युसुफ लकडावाला याच्याकडून ८० लाख घेतले होते असा आरोर राऊत यांनी केला होता. याबाबत त्यांनी ट्वीटदेखील केले होते. दरम्यान, राऊतांच्या या आरोपांनंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्वीटवर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार युसूफ लकडावालासोबत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे, आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे.

मोहित कंबोज यांनी ट्विटर अकाऊंटवरुन दोन-तीन फोटो शेअर केले आहेत. त्यापैकी एका फोटो निळा कोट परिधान केलेला युसूफ लकडावाला असून त्याच्या बाजुला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आहेत, असा दावा कंबोज यांनी केला आहे. त्यामुळे, आता संजय राऊत याप्रकरणात पोलिसांकडे तक्रार दाखल करणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.