यशवंतनगरमध्ये प्रचार बंदीचा भंग केल्याने राष्ट्रवादी नगरसेविका वैशाली घोडेकर विरोधात निवडणुक आयोगाकडे पुराव्यांसहीत तक्रार

0
929

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) –  प्रचार बंदी भंग करुन आज (रविवार) सकाळच्या सुमारास प्रभाग क्र. ९ यशवंतनगर येथील आपल्या वॉर्डात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर लोकसभेचे उम्मेदवार डॉ. अमोल कोल्हे यांची पत्रके वाटून प्रचार केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका वैशाली घोडेकर विरोधात निवडणुक आयोगाकडे पुराव्यांसहीत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे उपाध्यक्ष राम बनसोडे यांनी केली आहे.

पत्रके वाटतानाचे सीसीटीव्ही फुटेज आणि काही फोटो बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निवडणुक आयोगाकडे सादर केले आहेत. तसेच घोडेकर यांनी त्यांची कार (क्र. एमएच/१४/डीएन/३४५) मधून ही पत्रके वाटल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे घोडेकर यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. आता यावर निवडणुक आयोग काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.