मतदानासाठी मतदार ओळखपत्रासह ११ प्रकारची कागदपत्रे ग्राह्य; मतदार यादीत नाव असणे अनिवार्य

0
475

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. २९) सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होणार आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक आयोगाने आता केवळ छायाचित्रासह मतदार चिठ्ठी हे मतदाराचे ओळख कागदपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मतदारांना मतदान केंद्रावर आपली ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह असलेले मतदार ओळखपत्र किंवा निश्चित केलेल्या ११ अतिरिक्त ओळख कागदपत्रांपैकी एक पुरावा म्हणून सोबत न्यावे लागणार आहे.