“…म्हणून ब्राम्हणाला मी मुख्यमंत्रीपद दान केले”; एकनाथ खडसेंचा ‘या’ भाजपा नेत्याला चिमटा

0
218

जळगाव, दि.९(पीसीबी) – भारतीय जनता पक्षातून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीस यांच्याबद्दल नाराजी दर्शवताना खडसे यांनी चक्क त्यांच्या जातीचा उल्लेख केला. ‘मी ब्राह्मणाला मुख्यमंत्रिपद दान केलं,’ असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं. मुक्ताईनगर येथील एका कार्यक्रमात खडसे बोलत होते.

“नाथाभाऊ इतका दिलदार आहे की, आम्हाला सांगितलं गेलं नाथाभाऊ तू आता घरी बस मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. नाथाभाऊवर मुक्ताबाईचा आशिर्वाद आहे, त्यामुळे मी म्हटलं घे रे, तू भी क्या याद करेगा. मी भल्या भल्यांना दान देतो तर ब्राह्मणांना दान द्यायला काय हरकत आहे,” अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

“भाजपानं एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्यांना बाजूला केलं. एका व्यक्तीमुळे सरकारचं वाटोळं झालं,” अशी टीकाही खडसे यांनी केली.