…म्हणून अजित पवारांनी अण्णा हजारेंची मागितली माफी

0
580

अहमदनगर, दि. १ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विधानाचा पक्षाशी  काहीही संबंध नाही, त्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भावना दुखावल्या असतील, तर आपण त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, असे राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे म्हटले आहे.    

नवाब मलिक यांच्या वक्तव्यामुळे संतप्त झालेले अण्णा हजारे यांनी अजित पवार आणि  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट नाकारली होती. यावर  मलिक यांच्या त्या वक्तव्याशी पक्षाचा काहीही संबंध नाही. यामुळे हजारे दुखावले गेल्याने आपण दिलगिरी व्यक्त करतो, असे पवार यांनी नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, मलिक यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना हजारे संघाचे एजंट  आहेत, असा  आरोप केला होता. या प्रकरणी हजारे यांनी कायदेशीर सल्ला घेऊन मलिक यांच्याविरूद्ध  अब्रुनुकसानीचा  दावा दाखल करणार असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर पवार यांनी नगरमध्ये दिलगिरी व्यक्त केली आहे.