मोहननगर येथील विद्युत खांबाला आग

0
487

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – मोहननगर येथील स्पॉको टेक्नोलॉजीस या कंपनीजवळील विद्युत खांबाला आज (गुरुवार) सकाळी अचानक आग लागली. तसेच विज पुरवठा खंडीत झाला. या घटनेमुळे परिसरात एकच घबराट पसरली.

यावेळी स्थानिक गणेश बाबर यांनी घटनेची माहिती तातडीने अग्निशमन विभाग आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिली. यामुळे काही वेळातच तेथे अग्निशमन विभागाचे जवान आणि महावितरणचे कर्मचारी पोहचले. आणि काही वेळातच आग आटोक्यात आणून विद्युत व्यवस्था सुरळीत केली. यावेळी स्पॉको कंपनीतील कर्मचारी, मोहननगर पोलीस चौकीतील कर्मचारी आणि स्थानिकांनी सहकार्य केले.