मोशीत सावत्र भावाकडून भावावर चाकूने वार; गुन्हा दाखल

0
523

भोसरी, दि. ४ (पीसीबी) – एकाला मारहाण केल्याचा जाब विचारल्याने सावत्र भावाने भावावर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बोराडेवाडी रोड, मोशी येथे घडली.

याप्रकरणी सुनिल बाबुराव सस्ते (वय ३०, रा. बोराडेवाडी रोड, मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार विक्रम बाबुराव सस्ते (वय३५) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विक्रम याने बाळू महादेव मोरे (वय ४५) यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली होती. तसेच शिवीगाळ केली होती. याप्रकरणी फिर्यादी सुनिल यांनी आरोपी विक्रम याला जाब विचारला. यामुळे संतप्त झालेल्या विक्रम याने सुनिल यांच्यावर चाकूने वार करून जखमी केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत आहेत.