मोशीत धक्का लागला म्हणून तरुणाची दुचाकी जबरदस्ती पळवली

0
759

भोसरी, दि. २८ (पीसीबी) – दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरुन दोघा जणांनी एका तरुणाचा पाठलाग करुन त्याच्याजवळील दुचाकी जबरदस्तीने पळवून नेली. ही घटना बुधवारी (दि.२६) सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोशी टोल नाक्याजवळील युवराज हॉटेल समोरील रस्त्यावर घडली.

याप्रकरणी अभिषेक रामशरण दिवेदी (वय २९, रा. साहील फोरचुन पार्क ३०३, देहुरोड) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरील दोन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मोशी टोलनाक्याजवळ अभिषेक हा त्याची दुचाकी (क्र. एमएच/१४/एफपी/९६५९) वरुन जात होता. यावेळी अभिषेकच्या दुचाकीचा धक्का आरोपींच्या दुचाकीला लागला होता. यावर चिडलेल्या आरोपींनी अभिषेकचा पाठलाग करुन जबरदस्तीने त्याच्या ताब्यातील दुचाकी पळवून नेली. याप्रकरणी दुचाकीवरील दोन अज्ञात इसमांविरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.