धक्कादायक : एक महिन्याच्या बाळाला पाण्याच्या बादलीमध्ये बुडवून ठार करत आईने केला आत्महत्येचा प्रयत्न

0
778

सांगली, दि. २८ (पीसीबी) – आईने पोठच्या एक महिन्याच्या बाळाला पाण्याच्या बादलीमध्ये बुडवून ठार केले. त्यानंतर स्वत: देखील विहिरीत उडी मारुन आत्महत्या करुण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यात ती बचावली. ही धक्कादायक घटना सांगलीच्या जत तालुक्यातील आसंगीमध्ये घडली.

संगीता भानुदास गडदे (वय २२, रा. सांगली) असे स्वता: च्या बाळाला ठार करुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संगीतावर मुलाच्या खुनाचा आणि आत्महत्याप्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री घरातील सर्वजण झोपल्यानंतर पहाटेच्या सुमारास संगीता आपल्या बाळासह आत्महत्या करण्याच्या उद्देशाने बाहेर पडली. प्रथम संगीताने बादलीत आपल्या बाळाला बुडवून मारले. त्यानंतर गावाशेजारी असलेल्या एका शेतातील विहिरीच्या काठावर बाळाला ठेवून तिने विहिरीत उडी घेतली.

मात्र विहिरीत फार पाणी नसल्याने संगीताचा आत्महत्येचा प्रयत्न फसला आणि त्या विहिरीतच ती सकाळपर्यंत उभी राहिली. दरम्यान शेतमालकाचा मुलगा विहिरीवर मोटार चालू करण्यासाठी आला त्यावेळी त्याला मृतअवस्थेत असलेले बाळ दिसले. विहिरीत डोकावून पाहिले असता संगीता पाईपला धरुन उभी असल्याचे दिसले. गावातील लोकांच्या मदतीने संगीताला बाहेर काढून उपचारासाठी मिरज येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले.पोलीस तपासात आपल्या बाळाचा पाण्याच्या बादलीत बुडवून मारल्याचे संगीताने सांगितले. बाळाच्या खुनाचा आणि आत्महत्या करण्याचा गुन्ह्याप्रकरणी संगीतावर उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.