मोशीत टोळक्यांकडून दोघांना दगडाने मारहाण

0
693

मोशी, दि. २७ (पीसीबी) – जुन्या भांडणाच्या रागातून पाच जणांच्या टोळक्यांनी दोघांना दगडाने मारहाण करुन जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. २५) रात्री साडेआठच्या सुमारास मोशी येथे घडली.

याप्रकरणी कुमार पद्माकर रसाळ (वय ३५, रा. मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नान्या मासाळकर आणि त्याच्या चार साथीदारांविरोधीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास कुमार हे त्यांचा साडू गणेश यांच्यासोबत मोशी येथे दारु पित बसले होते. त्यावेळी आरोपी नान्या आणि त्याचे चार साथीदार तेथे आले. त्यांनी ‘भिमा रसाळ याला ओळखतोस का’ असे विचारले आणि जुन्या भांडणाच्या रागातून कुमार आणि त्यांचा साडू गणेश यांना दगडाने मारहाण करुन जखमी केले. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.