मोदी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार रूपये जमा करणार ?

0
1087

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना आखण्यास सुरूवात केली आहे. पाच राज्यांतील विधानसभा  निवडणुकीतील पराभवातून बोध घेऊन भाजप सरकार शेतकऱ्यांसाठी  अनेक योजना आणण्याच्या   प्रयत्नात आहे. याचाच भाग म्हणून निकष पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात सरकार प्रत्येक वर्षी १० हजार रूपये जमा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याबाबत  येत्या दोन आठवड्यात कॅबिनेट बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

ही रक्कम बियाणे, शेती साहित्य खरेदीसाठी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात येणार आहे. या योजनेची घोषणा २६ जानेवारीला होण्याची शक्यता आहे.  ही योजना ओडिशा सरकारची असून केंद्र सरकार ही योजना देशभरातील शेतकऱ्यांसाठी  राबविण्यासाठी  प्रयत्नशील आहे. ही योजना राबविण्याबाबत अर्थ आणि कृषी मंत्रालयात  अभ्यास सुरू आहे. ओडिशा सरकारने प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार रुपये जमा करते. या योजनेसाठी राज्याला १.४ लाख कोटी रुपयांचा निधी खर्च करावा लागतो.

दरम्यान, या योजनेत सरसकट सर्वच शेतकऱ्यांचा समावेश होणार  नाही.  या योजनेतून भूमीहिन शेतकऱ्यांना वगळण्याची शक्यता आहे. भूमीहिन शेतकऱ्यांवर शेत कर्ज  नसल्याचा निकष यासाठी लावण्यात आला आहे. केंद्र सरकार नवीन ग्रामीण पॅकेज योजनेवर विचार करत आहे. यासाठी राज्य सरकार आणि मंत्रालयांकडून माहिती मागवण्यात आली आहे.

तर दुसरीकडे, केंद्र सरकार तेलगंण मॉडेलचा अभ्यास करत आहे. यानुसार निकष पूर्ण करत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षात दोन वेळेस खते, बियाणेंच्या खरेदीसाठी प्रति एकर ४ हजार  रुपये जमा करण्याची योजना सरकार आणू शकते. मात्र, यासाठी सरकारवर सुमारे २ लाख कोटींचा बोजा पडू शकतो.