मोदीच पाकिस्तानचे पोस्टरबॉय; राहुल गांधींचा पलटवार  

0
430

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – पाकिस्तानमध्ये जाऊन तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांची पंतप्रधान मोदींनी गळाभेट घेतली होती. मोदी हेच पाकिस्तानचे पोस्टरबॉय  आहेत, असा पलटवार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरूवार) पत्रकार परिषदेत भाजपवर केला आहे.

पुलवामा हल्ला आणि भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर एअर स्ट्राइक केला होता. या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजप आणि  मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. याला मोदींनीच प्रत्युत्तर दिले होते. काँग्रेस नेते पाकिस्तानचे पोस्टर बॉय आहेत, असे मोदींनी म्हटले होते.

राहुल गांधी म्हणाले की, नवाझ शरीफ यांच्या मुलीच्या लग्नाला आम्ही पाकिस्तानात गेलो होतो का?, पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावरील हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या पथकाला पठाणकोट तळावर कोणी प्रवेश दिला? मोदींनीच त्यांच्या शपथविधी सोहळ्याला नवाझ शरीफ यांना  आमंत्रण दिले होते. शरीफ यांची गळाभेट घेणारेही मोदीच होते, असा पलटवार राहुल गांधी यांनी केला.