मोदींच्या मंत्रिमंडळात ‘या’ नेत्यांची वर्णी लागणार  

0
440

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद मोदी हे दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ आज (गुरूवारी) सायंकाळी घेणार आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळात कोण कोण असणार त्यांची नांवे जवळपास निश्चित झाली आहेत. शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरत कौर, भाजपा खासदार बाबूल सुप्रियो, भाजप नेते धर्मेंद्र प्रधान, मुक्तार अब्बास, सदानंद गौडा, गिरीराज सिंग, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर हे चेहरे कायम राहणार आहेत.

मोदींच्या दुसऱ्या सरकारमध्ये आधीच्याच मंत्र्यांना स्थान देण्यात आले आहे. पंतप्रधान  मोदी यांनी भाजपला लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवून दिले आहे. भाजपला ३०३ जागा मिळाल्या. तर भाजपप्रणित एनडीएला ३५० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे पुन्हा पंतप्रधानपदी मोदीच विराजमान होणार हे निकालाच्या दिवशीच निश्चित झाले होते. मोदींच्या मंत्रिमंडळात  आधीच्याच चेहऱ्यांना पुन्हा एकदा संधी  देण्यात आली आहे.

आता आणखी कोणकोणती नावे समोर येतात आणि टीम मोदीमध्ये आणखी कोण कोण असणार याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधीही  उपस्थित राहणार आहेत.