मोठी बातमी! कालीचरण महाराजांना अटक; पहाटे ४ वाजता पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

0
382

मुंबई , दि. 30 (पीसीबी) – राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजला अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात ही अटकेची कारवाई कऱण्यात आली. याआधी कालिचरण महाराज अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली म्हणून देखील चर्चेत आले. कालिचरण नाव असलेले हे महाराज मूळचे अकोल्यातील आहेत. नुकतच महाराजांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल धक्कादायक विधान करून खळबळ उडवून दिली.

गांधींबद्दल अपशब्द वापरत त्यांना शिव्या दिल्याप्रकरणी धर्मसंसद वादात सापडली होती. कालीचरण महाराजने या संसदेत केलेल्या भाषणादरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. यानंतर रायपूर पोलिसांनी आपले दोन गट महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात कालीचरण महाराजच्या अटकेसाठी पाठवले होते. यानंतर आज पहाटे ४ वाजता मध्य प्रदेशमधील खजुराहो बगेश्वरी धाम येथून त्याला अटक करण्यात आली आहे.

छत्तीसगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराजाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर ही कारवाई करण्यात आहे. त्यामुळे छत्तीसगड पोलीस मागील काही दिवसांपासून कालीचरण महाराजाच्या मागेवर होते. अखेर आज पहाटे त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.