मोठया घरची पोर रातोरात गांधींच्या मांडीवरुन गोडसेंच्या मिठीत विसावतात

0
378
मुंबई, दि.१३ (पीसीबी) – जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत वक्तव्य केले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये कोणाचाही उल्लेख केला नसला तरी हा अप्रत्यक्षपणे काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांना टोला असल्याचे बोललं जात आहे.
“निष्ठा, भक्ती, श्रद्धा, विचारधार, मोठ्या घरची पोरं भरलेल्या ताटातील लोणच्यासारखे तोंडाला लावतात. रातोरात गांधींच्या मांडीवरुन गोडसेंच्या मिठीत विसावतात,” असं जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. पुढे त्यांनी लिहिलं आहे की, “आपण मनापासून जिंदाबाद, मुर्दाबादचे नारे लावूयात. आणि म्हणू या नंगा ही तो आय़ा था क्या कपडा लेके जायेगा”. अस या ट्विट मध्ये म्हटले आहे.