जागतिक महिला दिनानिमित्त सावित्री महिला बचत गटाचे उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न

0
507
पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – ८ मार्च रविवार रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सावित्री महिला बचत गटाचे उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. या बचत गटाचे उद्घाटन नगरसेविका सौ. सुरेखा बोरूडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी बकेट बॉल, आल्टरनेट इंग्लिश मराठी आकडे सांगणे, बॉल पासिंग गेमचे आयोजन केले होते. खेळताना पाच विजेत्या जिंकल्या.  
सुनंदा कुरे, विधी शिंदे, तेजस्वीनी कोळी, मेघना बाफना यांनी पारितोषक जिंकले या कार्यक्रमाचे संयोजन नगरसेविका सुरेखा बोरूडे यांनी केले. नगरसेविका  सुरेखा बोरूडे यांनी महिला दिनाचे महत्व महिलांना पटुन दिले.
यावेळी चेतना भागवत, कमल माळवदकर, सुनंदा कुरे, चिया टेमगिरी, साधना चव्हाण, पुजा शाळ, स्वेता पाटील, तेजस्वीनी कोळी, विधी शिंदे, जोती बेहके आदी महिला उपस्थित होत्या.