मुलीच काय मुलंही सुरक्षित नाहीत; जया बच्चन यांना अश्रू अनावर

0
506

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार जया बच्चन बुधवारी भाषण देताना भावूक झाल्या. लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (संशोधन) कायदा २०१९ (पोस्को) संदर्भात बोलताना जया बच्चन भावूक झाल्याचे पहायला मिळाले. २०१४ साली दिल्लीत झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणाचा संदर्भ देताना जया बच्चन यांना आश्रू अनावर झाले.

‘निर्भया प्रकरणामधील आरोपींना अद्याप शिक्षा झालेली नाही. निर्भयाच्या आईला अजूनही आपण दूर्बल असल्यासारखे वाटते. आधी आई-वडीलांना केवळ मुलींची चिंता असायची. आता मात्र त्यांना आपली मुलेही सुरक्षित नसल्याचे वाटत आहे’ असे मत जया बच्चन यांनी व्यक्त केले आहे. लोकांमध्ये कायद्याची भिती राहिलेली नाही. लोकांमध्ये काद्याची भिती कायम रहायला हवा असे जया बच्चन म्हणाल्या.

राज्यसभेत लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (संशोधन) कायदा २०१९ (पोस्को) मंजूर झाला आहे. नवीन कायद्यामध्ये डिजीटल फोटो, कंप्युटरवरील अश्लील चित्रफिती या संदर्भात कायद्यामध्ये नियमांचा समावेश केला असून डिजीटल माध्यमातून लहान मुलांविरोधात होणाऱ्या अपराधांनाही कायद्याच्या चौकटीत आणले आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) नवीन कायद्यानुसार मुलांविरोधात होणाऱ्या अत्याचारांची नोंद ठेवावी असंही बालकल्याण आणि महिला विकास मंत्रायलाने सांगितले आहे. मुलांविरोधात किती गुन्हे घडले असून त्यापैकी गंभीर स्वरुपाचे गुन्हे कीती आहेत या सर्वांची नोंद एनसीआरबीने ठेवावी असे मंत्रालयाने म्हटले आहे.