मुरुड, अलिबागला वादळ धडकले

0
871
जानिये खतरनाक 'निसर्ग' के बारे में सबकुछ: Cyclone nisarga in india

मुंबई, दि. ३ (पीसीबी) : महाराष्ट्रावर घोंगावणारे निसर्ग चक्रीवादळ कोकणाच्या किनारपट्टीवर धडकण्यास सुरुवात झाली. दुपारी एकच्या सुमारास वादळ धडकण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. दुपारी 12.20 च्या सुमारास रायगड जिल्ह्यातील मुरुड, अलिबाग परिसरात या वादळाचा परिणाम जाणवला. दुपारी साडेबाराच्या सुमारास हे वादळ मुंबईपासून जवळपास 130 किमी अंतरावर पोहोचलं.
रायगड, रत्नागिरीत, सिंधुदुर्गात वाऱ्याने जोरदार वेग पकडला असून वाऱ्याचा वेग ताशी 100 ते 110 किमीवर पोहोचली. चक्रीवादळाचा प्रभाव आज (बुधवार 3 जून) आणि उद्या महाराष्ट्रावर पडण्याची शक्यता आहे. यासोबतच मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे
मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका हरिहरेश्वरसह अलिबागला बसण्याची शक्यता आहे.