पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नदी काठच्या रहिवाशांचे स्थलांतर

0
398

पिंपरी, दि.3 (पीसीबी): पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, मुळा आणि इंद्रायणी या तीन नद्या वाहतात. पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नदी काठच्या रहिवाशांचे महापालिकेच्या वतीने स्थलांतरण केले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा स्थलांतरण करताना अधिक सतर्कता बाळगली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
आयुक्त हर्डीकर म्हणाले, पावसामुळे पवना, मुळा, इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित करण्याची गरज पडली.
तर, महापालिका शाळेत त्यांचे स्थलांतर करण्याचे नियोजन आहे. स्थलांतरित करताना सुरक्षित अंतर पाळले जाणार आहे. त्यासाठी जास्त शाळांमध्ये कमी लोकांना ठेवावे लागणार आहे.
पूर्वी एका शाळेमध्ये जेवढे नागरिक ठेवत होतो. आता तेवढे नागरिक चार शाळांमध्ये ठेवावे लागणार आहे. त्यादृष्टीने व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्याठिकाणी किट ठेवण्यास सांगितले आहे. कारण, स्थलांतरित लोक थोडेफार कपडे घेवून येतात. पण, प्रत्येकाकडे मास्क, सॅनिटायझर असण्याची शक्यता नाही. त्यामुळे जिथे केंद्र केले जातील. तिथे मास्क, सॅनिटायझर ठेवण्यात येणार आहे, असे हर्डीकर यांनी सांगितले.