मुख्यमंत्र्यांचे बोलणे म्हणजे लबाडा घरचे आवताण – शरद पवार

0
417

रत्नागिरी, दि. २५ (पीसीबी) –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बोलणे, वागणे हे लबाडा घरचे  आवताण  आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  रत्नागिरीत आयोजित  महाराष्ट्र एसटी संघटनेच्या ५५ व्या राज्यव्यापी वार्षिक अधिवेशनात बोलताना केली.  

शरद पवार म्हणाले की,  एसटीच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देऊ, धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते, अशी अनेक आश्वासने दिली. मात्र, त्यापैकी एकही पूर्ण केलेली नाहीत.  त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे बोलणे, वागणे हे लबाडाच्या घरचे आवताण आहे.

मुख्यमंत्री पाच वर्षांपूर्वी बारामतीला आले. आमचे सरकार आल्यावर आठ दिवसांच्या आत आरक्षण देऊ, पाच वर्ष झाली तरी आरक्षणाचा पत्ता नाही. तीन वर्षांपूर्वी तुमच्या अधिवेशनात आले. सातव्या आयोगाची घोषणा केली, अनेक आश्वासने दिली,  पण त्यापैकी कोणतेही  आश्वासन पूर्ण केले नाही, असे पवार म्हणाले.