पुण्यात मोर्चा घेऊन आलेल्या मूकबधिर विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केला लाठीचार्ज

0
654

पुणे, दि. २५ (पीसीबी) – विविध मागण्यांसाठी पुणे समाजकल्याण आयुक्तालयावर आज (सोमवार) दुपारी मूकबधिर विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. मात्र या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेमध्ये काही मूकबधीर विद्यार्थी जखमी झाल्याचे समजते.

प्राप्त माहितीनुसार, आज सकाळी विविध मागण्यांसाठी राज्यातील विविध भागातून आलेल्या मूकबधिर विद्यार्थ्यांनी पुणे समाजकल्याण आयुक्तालयावर मोर्चा काढला होता. यावेळी पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या घटनेमध्ये काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी लाठीचार्ज केला नसून सौम्य बळाचा वापर केल्याचे म्हटले आहे.  तर विद्यार्थांनी, आम्ही शांततेत मोर्चा काढला होता मात्र पोलिसांनी लाठी चार्ज केला असे म्हणने आहे. पोलिसांच्या लाठीचार्जमुळे संतापलेल्या मूकबधीर आंदोलकांनी आक्रमक धोरण स्वीकारले असून सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे. या घटनेमुळे सर्वस्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.