मी नाराज असल्याचे वृत्त चुकीचे; पंकजा मुंडेंचा खुलासा

0
678

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीतून नाराज होऊन बाहेर पडल्याचे वृत्त चुकीचे आहे. सदस्यच नसल्याने मी बैठकीला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा खुलासा राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. 

सदस्य नसतानाही मराठा आरक्षणाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीला पंकजा मुंडे  उपस्थित होत्या.  बैठकीत काही मुद्दे मांडून त्या नाराज होऊन बाहेरही आल्या. यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, असे वृत्त समोर आले होते. पण हे वृत्त चुकीचे असून अशा बातम्या पसरवू नका, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

पंकजा म्हणाल्या की,  मी नाराज असल्याचे  वृत्त  चुकीचे आहे. मराठा समाजाच्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये मी नाही. मराठा आरक्षणाचे आंदोलन झाले, त्यावेळी मी पुढे होते. चुकीची बातमी दाखवू नये ही विनंती. मी त्या बैठकीत गेले नव्हते. बैठक ज्या हॉलमध्ये होती तिथे इतर सदस्यही होते. बैठक सुरु झाल्यावर मी बाहेर गेले कारण मी सदस्य नाही. आरक्षणावर सरकार योग्य निर्णय घेणारच, ओबीसीला धक्का लागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.