‘मी तुझ्या दिराला जसे संपवले तसे तुझ्या नव-याला देखील संपवतो’ अशी धमकी देत केला महिलेचा विनयभंग

0
247

पिंपरी, दि. 7 (पीसीबी) – शेतात बांबू लावण्यास विरोध केला म्हणून महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. कासारवाडीतील शितांगण गार्डन शेजारी शनिवारी (दि. 06) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेनं शनिवारी (दि. 06) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी मंगेश अंकुश लांडे (रा. कासारवाडी) याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेच्या शेतात बांबू लावण्यास विरोध केला. तसेच, ‘मी तुझ्या दिराला जसे संपवले तसे तुझ्या नव-याला देखील संपवतो’ अशी धमकी दिली. आरोपीने फिर्यादी महिलेला वाईट शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक साबळे करीत आहेत.