मी अनेक चुका केल्या पण बाळासाहेब पहाडासारखे माझ्या मागे उभे राहिले – संजय राऊत

0
462

बेळगाव,दि.१९(पीसीबी) – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी “मी अनेक चुका केल्या पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सतत माझ्या पाठीशी उभे रहायचे. त्यांच्यात दिलदारपणा होता. माझ्या अनेक चुका त्यांनी पोटात घेतल्या म्हणून माझा प्रवास झाला” असं बेळगावमध्ये एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

बाळासाहेब माझे हिरो होते. आजही आहेत. बाळासाहेबांनी मला इंडियन एक्सप्रेसमध्ये पाठवलं. तिथं सर्व कामं केली. अगदी पेपरचे गठ्ठे बांधले. बाळासाहेब सतत पाठिशी उभे रहायचे, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

मी माझं जीवन बाळासाहेबांना अर्पण केलं आहे. मी त्यांचा विचार घेतला. माझ्या नसानसात त्यांचा विचार आहे. बाळासाहेबांची भूमिका काय असू शकते हे मला कळायचं. बाळासाहेब चिडायचे ही कॉम्प्लिमेंट असायची, असंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे.