माहेरहून 15 लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

0
293

वाकड, दि. 17 (पीसीबी) : माहेरहून 15 लाख रुपये आणण्याची मागणी करत तसेच पतीच्या विवाहबाह्य संबंधबाबत जाब विचारल्याने विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना 6 जानेवारी 2013 ते 16 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये कस्पटे वस्ती, वाकड येथे घडली.

पती राजेंद्र लक्ष्मण दगडे (वय 39), दीर योगेश लक्ष्मण दगडे (वय 35), सासरे लक्ष्मण अण्णा दगडे (वय 60), सासु (वय 58), नणंद (वय 37, सर्व रा. कस्पटेवस्ती, वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पीडित विवाहितेने गुरुवारी (दि. 16) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीचे शेजारच्या महिलेशी प्रेम संबंध असल्याची माहिती त्यांना मिळाली. याबाबत त्यांनी पतीला जाब विचारला. या कारणावरून चिडलेल्या पतीने फिर्यादी यांना शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. तसेच सासू-सासरे व इतर आरोपींनी घर बांधण्यासाठी ‘माहेरावरून 15 लाख रुपये घेऊन ये नाहीतर तुला आम्ही नांदणार नाही’, असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच इतर कारणावरून वेळोवेळी फिर्यादी यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.