माझ्या मुलाच्या पराभवाची जबाबदारी सचिन पायलटनी स्वीकारावी – अशोक गेहलोत

0
444

जयपूर, दि. ४ (पीसीबी) – वैभव गेहलोत याच्या पराभवाची जबाबदारी राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी स्वीकारावी,  असे वैभव यांचे वडील व मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे.  यामुळे लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत.

जोधपूर लोकसभा मतदारसंघात आपले सहा आमदार आहेत. त्यामुळे आपण तिथून मोठया मताधिक्याने विजय मिळवू असे पायलट साहेब म्हणाले होते. आमचा प्रचार सुद्धा चांगला झाला होता. त्यामुळे त्यांनी त्या जागेची जबाबदारी घ्यावी. जोधपूरची जागा आम्ही का जिंकलो नाहीष, त्याचे सखोल विश्लेषण झाले पाहिजे असेही अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे.

आमचा सर्वच्या सर्व २५ जागांवर पराभव झाला. याबद्दल जर कोणी म्हणत असेल की, मुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्षांनी याची जबाबदारी घ्यावी, तर माझ्या दृष्टीने ही सामूहिक जबाबदारी आहे. दरम्यान, वैभव गेहलोत जोधपूरमधून निवडणूक लढवत होते. अशोक गेहलोत यांच्या विधानावर सचिन पायलट यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.  यावर त्यांनी  काहीही  बोलण्यास नकार दिला आहे.