माझे काही बरं वाईट झाल्यास त्याला; नांगेर पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील

0
708

मुंबई, दि २८ (पीसीबी) – मराठा समाजाला काल मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षणात १२ तर नौकरीत १३ टक्के आरक्षणाला मान्यता दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याविषयी बोलताना ‘हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात मी सुप्रीम कोर्टात जाणार आहे. मराठा आरक्षणाबाबतचा निकाल घटनाबाह्य असून तो दबावाखाली दिला गेला आहे. पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील आणि इतर मराठा संघटनांकडून माझ्या जीवाला धोका आहे. उद्या माझे काही बरं वाईट झाल्यास त्याला नांगेर पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील,’ असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

दरम्यान, मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाच्या निर्णयाचं सगळीकडून कौतुक होत आहे. या निर्णयामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणात आणि नोकरीत फायदा होणार आहे त्यामुळे मराठा समाजात आनंदाचे वातावरण आहे.