माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडला

0
447

सांगली, दि. २४ (पीसीबी) – माजी केंद्रीय मंत्री आणि सांगलीतील काँग्रेसचे नेते प्रतीक पाटील यांनी आज (रविवार) काँग्रेस पक्ष सोडत असल्याची घोषणा जाहिर सभेत केली. प्रतीक पाटील यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसने सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याचा निर्णय घेतल्याने नाराज पाटील यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. सांगली येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली.

गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असलेले प्रतीक पाटील हे काँग्रेसचा राजीनामा देणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, स्वत: प्रतीक पाटील त्यांनी पक्ष सोडणार नसल्याचे माध्यमांना म्हटले होते. अखेर त्यांनी काँग्रेस सोडत असल्याचे जाहीर केले. प्रतीक पाटील हे दिवंगत काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत.