कोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटला

0
427

कोल्हापूर, दि. २४ (पीसीबी) – लोकसभा निवडणूकीसाठी महायुतीच्या प्रचाराचा नारळ आज (रविवार)  कोल्हापुरातून फुटला. या सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले.

कोल्हापुरात प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार असल्याने युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे; तर विरोधकांचा ठाकरे शैलीत कशा पद्धतीने खरपूस समाचार घेतला जाणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.