माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला ऑनलाईन गंडा, 1.14 लाखांची लूट..

0
309

मुंबई , दि. १० (पीसीबी) -माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी केव्हायसीच्या नावाखाली लुटणाऱ्या सायबर गुन्हेगारांना बळी पडल्याचं समोर आलं आहे. विनोद कांबळीच्या बँक खात्यातून आरोपींनी 1 लाख 14 हजार रुपयांची रक्कम उडवल्याची माहिती आहे. बँक अधिकारी असल्याचं भासवून आरोपींनी रिमोट अॅक्सस घेत त्यांच्या खात्यातून रक्कम वळती केली.

वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. विनोद कांबळीचं खातं असलेल्या प्रायव्हेट बँकेचा अधिकारी असल्याचं भासवून आरोपीने फोन केला होता. केव्हाआयसी कागदपत्रं अपडेट करण्याच्या नावाखाली त्याने गूगल प्ले स्टोअरवरुन एनीडेस्क अॅप डाऊनलोड करायला लावलं.
विनोद कांबळीने अॅपचा अॅक्सेस कोड आरोपींना दिला. त्यामुळे त्याच्या फोनमधील सर्व अॅक्टिव्हिटी ठकसेनांना पाहता येत होत्या. त्यानंतर आरोपींनी विनोदला लहानशी रक्कम ट्रान्सफर करण्यास सांगितलं, त्यावेळी त्याचे बँकिंग तपशील आणि वन टाईम पासवर्ड (ओटीपी) लिहून घेतला. त्यानंतर 1.14 लाखांची रक्कम आरोपींनी आपल्या खात्यात ट्रान्सफर करुन घेतली.
संबंधित ट्रान्झॅक्शनबद्दल एसएमएस अलर्ट आल्यानंतर विनोद कांबळीने आपल्या बँकेत फोन केला. त्याचबरोबर वांद्रे पोलीस स्टेशनलाही धाव घेतली. या प्रकरणी एफआयआर दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली असून अधिक तपास सुरु आहे.