माँसाहेब आणि आदरणीय बाळासाहेब…हे सर्व पहायला तुम्ही दोघे असायला हवे होतात – सुप्रिया सुळे

0
446

मुंबई,दि.२८(पीसीबी) – माँसाहेब आणि आदरणीय बाळासाहेब…! आज तुमची खुप आठवण येतेय. हे सर्व पहायला तुम्ही दोघे असायला हवे होतात. तुम्हा दोघांनी मला मुलीपेक्षाही जास्त प्रेम दिले. तुम्ही माझ्या आयुष्यात स्पेशल होता, आहात आणि राहाल, असं भावूक ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचं एकत्रित सरकार येणार आहे. महाराष्ट्रासाठी हे सत्ता समिकरण नविन आहे.

आजचा सूर्योदय एका नवा इतिहास रचतोय. महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार राज्यात येत आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. देशात महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण काम करु, असं एक ट्विट सुप्रिया सुळेंनी केलं होतं.