महावितरणचे कॉपर कॉईल चोरीला

0
258

तळेगाव दाभाडे,दि.२५(पीसीबी) – अज्ञात चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणांवरून विद्युत रोहीत्रातील 40 हजारांची कॉपर कॉईल चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 23) सायंकाळी सहा वाजता सुदवडी आणि नवलाख उंब्रे येथे उघडकीस आली.

गणेश विक्रम बांगर (वय 23, रा. एकतानगर, चाकण) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव-चाकण रोडवर सुदवडी येथून आणि मिंडेवाडी नवलाख उंब्रे येथून अज्ञात चोरट्यांनी विद्युत रोहीत्रातील एकूण 80 किलो वजनाची 40 हजार रुपये किमतीची कॉपर कॉईल चोरून नेली. हा प्रकार 17 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या कालावधीत घडला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.