महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार ; मात्र, आम्ही मोदींसोबतच- नारायण राणे

0
401

कणकवली, दि. २५ (पीसीबी) – रत्नागिरी -सिंधुदुर्गसह राज्यातील इतर मतदारसंघांत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. मात्र,  आम्ही भाजपच्या मोदींसोबतच असून एनडीएमधील  घटक पक्ष आहोत, असे खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे.

कणकवली येथील प्रहार भवन येथे पत्रकार परिषदेत नारायण राणे  बोलत होते.

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून  माजी खासदार नीलेश राणे यांची उमेदवारी महाराष्ट्र स्वाभिमानतर्फे  जाहीर करण्यात आली आहे. भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा  देण्यासाठी  या पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची आम्ही संपर्क साधणार आहोत, असे  राणे यांनी  सांगितले.

राणे म्हणाले,  राज्यात शिवसेना आणि भाजप या पक्षातील नेत्यांमध्ये युती झालेली आहे. मात्र, कार्यकर्त्यांचे मनोमिलन झालेले नाही. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार असेल तेथे भाजपचे कार्यकर्ते  विरोधात मतदान करतील, तर जेथे भाजपचा उमेदवार असेल, तेथे शिवसेनेचे कार्यकर्ते  विरोधात मतदान करतील.  या फायदा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांसह काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना होईल,असे ते म्हणाले.